Tuesday, 13 November 2012

नवीन नळीच्या शोधासाठी माळशेजमध्ये ४ नोव्हेंबर २०१२

          माळशेज नाव ऐकताच डोक्यात काय येत? तर त्या सह्याद्रीच्या अफाट पर्वत रांगा आणि त्यात ट्रेकरची पंढरी असलेला हरिश्चंद्रगड आणि कोकणकडा. हरिश्चंद्रगडावरती जाण्यासाठी बऱ्याच वाटा आहेत, पण नळीची वाट थोडी अवघड आहे असे एकले होते. गेली दीड वर्ष भटकंती चालू आहे पण कधी नळीच्या वाटेने जाण्याची संधी मिळाली नव्हती त्याची खंत मनाला कुठे तरी लागत होती पण कोकण कड्याचे दर्शन २ ऑक्टोबरला २०१२ रोहिदासला जाताना शेंडी सुळक्याच्या बाजूने झाले होते. 



           अरुण सावंत सर याच्या बरोबर मदन वरतून कुलंग जाणारी नवीन वाट शोधल्यावर नवीन काही केले नाही होते. पण कोणतीही नवीन वाट शोधताना जो काही कस्स लागतो ज्याची मज्जा काही तरी वेगळीच आहे हे माहित होते. तसच काही दिवसानपूर्वी अरुण सर यांनी सागितले कि ३ व ४ नोव्हेंबर २०१२ ला कुठे तरी घुसायचे आहे तयार राहा, मग काय मी तर एका पायावरती तयार झालो. २ नोव्हेंबरला रात्री ९ च्या सुमारास मी जोगेश्वरीतून निघालो, लगेच अंधेरीला प्रकाश केळशीकर सर आणि शहाडला प्रसाद सामंत व कुणाल भावे आम्ही ५ जन बैलपाडा गावात १२ वाजता पोचलो. सकाळी लवकर ६ वाजता आम्ही चालायला सुरवात केली. आम्ही हळू –हळू नेहमीच्या नळीच्या वाटेच्या दिशेने चालायला सुरवात केली मी खूप खुश होतो पहिल्यादा नळीच्या वाटेने मी जाणार होतो. एका ठिकाणी चहा, नाश्ता करून पुढे निगालो. तेव्हा नेहमीच्या नळीच्या वाटेच्या डाव्या बाजूला जी नळी त्या नळीमधून खाली उतरायचे आहे हे समजले ते ही आज संध्याकाळपर्यंत.







          लवकर भरभर चालत आम्ही पहिल्या २५ फूट कातळाजवळ पोचलो. पहिले प्रसाद सामंतनी प्रस्तरोहण केले प्रत्येकानी आपापले समान वरती नेले. लगेच आम्ही दुसऱ्या ३० फूट कातळाजवळ पोचलो. पहिले कुणाल भावेनी प्रस्तरोहण केले, सर्व जन वरती पोचले तेव्हा १ वाजून गेला होता. मग आत्ता जेवून पुढे निघूया जेवण ५ मिनटात तयार झाले, डांगर आणि भाकरी खूप वर्षांनी डांगर चाखायला मिळाले. थोडस वरती जावून आम्ही जिथे पहिली नळी संपते तिथे पोचलो. तिथे हरिश्चंद्रगडाच्या दिशने वरती जावून पाहणी केली तेव्हा वरती जाणारी वाट सोडून आम्ही जंगलात डाव्या बाजूला उतरलो. ४ वाजता आम्ही एका पाठरावती पोचलो. तिथे आम्ही विचार केला आणि त्याच पाठरावरती आजचा मुकाम करायचा हे ठरवले. मुकाम जर करायचा असेल तर पाणी पण पाहिजे. मी आणि प्रकाश सर निघालो पाणी शोधायला हे सर्व करता करता आम्हाला भर जगलात ५ ते ६ खोपटी म्हणजे झाडाच्या फांद्यापासून बनवलेली छोटी छोटी घरे दिसली ही गोष्ट कधी एकदा सर्व मंडळी ना सागतोय अस्स झालेलं मी खूप खुश होतो कारण फक्त माझ्याकडे स्लिपिंग ब्याग नव्हती


. १० मिनटांच्या अंतरावर पाणी पण दिसले, जणू भर जंगलात आम्हाला ५ स्टार हॉटेल मिळाल्याचा आनंद झाला. ४:१५ झाले होते वेळ तर खूप होता मग अरुण सर आणि प्रसाद वरच्या दिशेला नवीन नळीच्या टोकाच्या दिशेने निघाले. उद्या ज्या ठिकणी जायचे आहे तिकडची वाट बघायला म्हणजे आमचा सकाळी वेळ थोडा वाचेल. मी आणि कुणाल पाणी भरायला गेलो. ५ वाजता वरच्या दिशेने शिटीचा आवाज आला तेव्हा अरुण सर आम्हाला दिसले. ६ वाजता प्रसाद आणि अरुण सर खाली आले. कॉफी करून थोड्या गप्पा मारून जेवायची तयारी केली अंड्याची बुर्जी तयार करून जेवण झाल.



           सकाळी ८ च्या सुमारास आम्ही वरच्या नळीच्या दिशने चालू लागलो. ९ वाजता नळीच्या टोकावरून आम्ही खाली उतरायला सुरवात केली समोरच असलेला शेंडी सुळका लक्ष वेधून घेत होता. ४० ते ५० फूट खाली उतरून आम्ही पहिला ३५ फूट कातळ रोपच्या साह्याने खाली उतरलो. तीस मिनटात लगेच दुसरा टप्पा चालू झाला पण इथे खाली किती फूट आहे ती दिसत नव्हते कारण खाली चिमणीसारखे काही तरी होते हे कालच बघीतले होते परंतु ते खूप रुंद होते त्यामुळे त्याला पूर्णपणे चिमणी बोलता येणार नाही जवळ जावळ हे अंतर १५० होते. प्रसाद पहिला खाली उतरला आणि शेवटी प्रकाश सर. दुपारचे १ वाजून गेले होते पाणी काटकसरीने वापरात होतो पाणी कुठे असेल कि नाही आज खाली उतरणार कि नाही ह्याची शंका मानामध्ये होती, अजून किती वेळा रोप लावला लागेल ह्याची काहीच कल्पना नव्हती. आम्ही समोरच्या शेंडी सुळक्याकडे बघून आपण अजून खूप वरती आहे असे बडबडत होतो. पण अरुण सर आपल्या मतावर्ती ठाम होते संध्याकाळच्या आत आपण शेंगा पोईंटला तरी जाणारच. हे ऐकल्यानंतर आम्हाला पण हुरूप आला. 




          तिसरा ३५ फूट कातळ रोपच्या साह्याने खाली उतरलो. प्रसाद आणि मी पुढे काय वाढून ठेवलं आहे ते बघत होतो पुन्हा जसा दुसरा कातळ उतरलो तसच काहीस कराव लागेल ह्याची कल्पना आली आणि तोही तेवढ्याच उंचीचा. चौथा १५० फूट कातळ चालू झाला प्रसाद पहिला खाली उतरून शेवटी प्रकाश सर ह्याच क्रमाने आम्ही सर्व खाली उतरलो. समोरच आम्हाला थोडे पाणी दिसले मग ते पाणी पिले. ४ वाजून गेले होते खाली कुठे रोप लागेल का हे बघत चालत होतो प्रसाद पुढे त्याच्या मागे मी, कुणाल, अरुण सर आणि प्रकाश सर. समोर झाडी चालू झाली आपण लवकर शेंगा पोईंटला पोचणार ह्याची कल्पना अरुण सरांनी दिली तेव्हा ५ वाजले होते. रोपची आत्ता गरज भासणार नाही हे दिसत होते. ६ वाजता बरोबर शेंगा पोईंटला आलो. आमचा प्लान यशस्वी झाला मग लगेच अरुण सरांनी करंजी देवून आम्ही जल्लोष केला. ७ वाजता बैलपाडा गावात पोचलो. 
          हे सर्व शक्य झाले ते त्या मशीनमुळे (प्रसाद सामंत). कुणाल भावे जो सर्व छोट्या छोट्या पण महत्वाच्या कामे करत होता. मी फक्त पाणी जमा करायचे काम करत होतो. प्रकाश केळशीकर सर तांत्रिक दृष्ट्या सक्षम होते. अरुण सावंत सर ह्याचा फक्त अनुभव बोलतो.