Tuesday, 22 January 2013

सह्याद्रीच्या सर्वात खोल दरीतून केलेला प्रवास ४,५,६ जानेवारी २०१३

४/५/६ जानेवारी २०१३ रोजी आम्ही कात्राबाई शिखराच्या पश्चिम दिशेने ४५०० फुटांवरून थेट कोकणात उतरणाऱ्या महाराष्ट्रातील सर्वात खोल दरीचा शोध लावला. तसेच कोकणातून डेहेणे गावातून रतनगडावर (आता कोसळलेल्या) १२ पायऱ्यांच्या मार्गाने वर येणारी पुरातन वाट शोधून काढली. त्याचा हा वृत्तांत ...!!

डिसेम्बर मध्ये ट्रुई व क्रिस्टी या दोन फिरंगी हिरकण्यांबरोबर अरुणसर, प्रकाशसर व शंतनूसर यांचेबरोबर मी कुरंगगड, अलंगगड, मदनगड, व रतनगड या ट्रेकला गेलो होतो. रतनगडावर फेरफटका मारत असताना सोबत असलेल्या सामरद गावातील गोपाळ मामांनी रतनगडच्या पुरातन १२ पायऱ्यांच्या रस्त्याची कल्पना दिली आणि ती खिंड दुरून दाखवीली. तेव्हा अरुण सरांनी सांगितले की पूर्वीच्या काळी रतन गडावर येण्यासाठी पायऱ्यांच्या एकूण तीन वाटा होत्या. पैकी सध्या दोन पायऱ्यांच्या वाटाच शिल्लक आहेत. साधारण १०० वर्षांपूर्वी एक वाट कोसळून गेली. तिथे आता सरळ कडा आहे. कोकणातून डेहेणे वरून येणारी १२ पायऱ्यांची वाट या कोसळलेल्या पायऱ्यांना मिळायची. अंदाजे ३ वर्षांपूर्वी इथून तुटलेल्या पायऱ्यांच्या कड्यावरून दोराच्या साह्याने (Rappelling) करून आम्ही खाली उतरलो होतो. तेव्हा डेहेणेला जाणारा रस्ता केव्हातरी शोधायचे ठरविले होते.हे सर्व बोलणे चालू असताना अरुण सरांनी समोरच असलेला कात्राबाई आणि आजोबाचा डोंगर दाखवला. ही दोन्ही शिखरे अजस्त्रच आहेत.त्यात कात्राबाईच्या डोंगराची एक घळ जी रतनगड वरून बघितली तर कात्राकड्याच्या उजव्या अंगाला दिसते, “ती घळ पुढील महिन्यात आपल्याला उडवायची आहेअसे अरुण सरांनी सांगितले. पण ह्या वेळी मी थोडा निराशच होतो. कारण मला काही या मोहिमेला यायला जमणार नव्हतं. माझे ठरलेच तर यायत्या वेळेला माझी मोटर सायकल घेवून येवू शकेन असे मी अरुण सरांना सांगितले.


४/५/६ जानेवारी या तारखा निश्चित झाल्या. पण अखेरच्या दिवसापर्यंत माझ काही खर दिसत नव्हतं. त्याच दिवसी सकाळी काही ट्रेकर मंडळीशी फोनवरती चर्चा झाली आणि मला जोर आला. आत्ता काही झाल तरी जायाच ...! मग लगेच अरुण संराना फोन केला, सर मी येतोय. पण तो पर्यंत वेळ निघून गेली होती. अरुण सरांची कार फुल झाली होती. मग काय दुचाकी जिंदाबाद...! झेनोश पटेल ची बुलेट होतीच. ३ जानेवारी ला रात्री ९ वाजता आम्ही जोगेश्वरी मधून निघालो अरुण सर, प्रकाश सर, कार मधून निघाले. पुढे ठाण्याच्या जवळपास राज बाकरे (प्रसिध्द प्रस्तारोहक) त्यांना सामील झाला. माझ्याबरोबर कुणाल आंबेरकर होता. झेनोष पटेल आणि प्रसाद सामंत हे कल्याण भिवंडी फाट्या जवळ एकत्र भेटले.
रात्रीची थंडी अंगाला चांगलीच झोंबत होती. कासारा घाटाच्या तळाला एका टपरीत चहा कॉफी घेवून आम्ही पुढे सामारदच्या दिशने निघालो. रात्रीच्या २:३० च्या सुमारास आम्ही सामारद गावात पोहोचलो. बेफाट थंडी मुळे झोप काही लागली नाही ...!


सकाळी यशवंताच्या पडवीत चहा नाश्ता करून साधारण ८ च्या सुमारास आम्ही कात्राबाईच्या दिशने चालायला सुरवात केली. आमच्या बरोबर गोपाळ मामा होते. रतनगड ला डाव्या अंगाला ठेवून आम्ही कात्राबाईच्या खिंडीत जाणार आहोत याची मला कल्पना होती. १० वाजता आम्ही रतनगदाखालील चौफुल्यावर येऊन पोहोचलो. तिथे थोडा दम टाकला. 

प्रत्येकाच्या पाठीवर ओझे थोडे जास्तच होते. ३५० फुटांचा मोठा दोर, इतर छोटे छोटे दोर, हार्नेस, क्यार्याबिनर, म्हणून अरुण सरांनी कात्राबाईच्या खिंडीत पोहोचलेल्या साबळे मामांना फोन केला आणि तुमच्या बरोबर असणाऱ्या गावकऱ्यांना इकडे थोड रतनगडाच्या दिशने पाठवा आमच्याकडे वजन खूप आहे असे सांगितले. साबळे मामा आदल्या दिवशीच सावळेराम आणि बजरंग हयांना बरोबर घेऊन खिरेश्वर - पाचनई मार्गे कुमशेतला येउन राहिले होते. सकाळी लवकर निघून कात्राबाईच्या मंदिराजवळ येवून थांबले होते. आम्ही रतनगडच्या खाली असलेल्या पाण्याच्या टाक्यामधून पाणी भरून घेतले.

 आत्ता पुढे कुठे पाणी मिळण्याची शक्यता कमी होती. थोड्याच वेळात सावळेराम व बजरंग यांची भेट झाली. चला ... सामानाचे ओझे थोडे कमी झाले. नशिबाने वाटेल थोडेसे पाझरणारे पाणी लागले. तिथे आम्ही जेवण उरकून घेतले. चपाती, कोबीची भाजी, डांगर, लसणीची चटणी, लोणचे..!

१ वाजला होता. लवकरच आम्ही कात्राबाई पास च्या मंदिरा जवळ पोहोचलो. जिथे साबळे मामा आमची वाट बघत होते. सार्वजण तिथला परिसर न्याहाळत बसले. ज्या दिशने आम्ही आलो त्या दिशेला रतन, मदन, अलंग, कळसुबाई ची रंग दिसत होती. तर समोर आजोबा, हरिश्चंद्रगड, नाफता आदी पर्वत शिखरे दिसत होती. डाव्या अंगाला घनचक्कर तर उजव्या अंगाला रतनगड. अरुणसरांचे सर्व काही तोंडपाठ होते. त्यांचेबरोबर असल्यावर आपल्या ज्ञानात खूपच भर पडते.


रतन वाडीतून कुमशेत कडे जाणाऱ्या एका गावकऱ्यांने सांगितले की तुम्ही असेच डाव्या अंगाने वर जा म्हणजे खालच्या अंगाला तुम्हाला पाणी मिळेल. मग आम्हाला थोडा धीर आला. आम्ही साबळे मामाच्या मागून सर्व पुढे चाले होते. पाण्याचा साठ कुठे दिसतोय का ते बघत होतो. पण कसले काय ... आम्हाला कुठेही पाणी सापडले नाही. दोन तास फुकट गेले. शेवटी आम्ही कात्राबाईच्या दुसऱ्याच टोकाला येवून थडकलो. तिथून रतनगडाचा थोडासा भाग दिसत होता. आत्ता बराच वेळ वाया गेला होता. मुख्य म्हणजे आम्हाला ती घळ शोधायची होती. जीच्यातून आम्हाला उद्या उतरायचे होते.

आम्ही सर्व रतनगडाच्या दिशेने वरती गेलो. अरुणसर, साबळे मामा, प्रसाद, मी आणि सावळेराम त्या घळीच्या दिशेने जात होतो तेव्हा अरुण सरांची नजर एका दगडाच्या खाचीत पडली. त्या दगडाच्या भेगेमध्ये एक छोटासा खड्डा होता. त्याच्यामध्ये पाणी होते.(एखाद्या माणसाची नजर किती तीक्ष्ण असते हे त्याच उत्तम उदाहरण). मी बाजूलाच होतो. लगेच मला अरुण सरांनी बोलवून ते पाणी दाखवले. आम्हा सर्वांचाच जीव भांड्यात पडला. आम्हाला पाण्याचा शोध लागला होता.


थोडे पुढे चालल्यावर ती घळ पण आम्हाला सापडली. अगदी त्या अचानक सापडलेल्या पाण्याच्या साठ्यापासून अवघ्या पाच मिनिटांवर. त्याघळीचे पात्र मात्र प्रचंड दिसत होते. मी तर जर हबकूनच गेलो. माझ्या अनुभवानुसार आत्तापर्यंतची ही सर्वात उंचीवरून सुरु होऊन सर्वात खोलवर जाणारी घळ असावी बहुतेक.सूर्य अस्ताला जाण्याची वेळ जवळ आली होती. लवकरात लवकर आम्हाला राहण्याच्या जागेची सोय करायाची होती. मग मागच्या मंडळीना पाणी आहे ती खुश-खबर देवून मी राहण्याच्या जागी घेऊन आलो. अरुणसर, साबळेमामा, सावळेराम, बजरंग जेवणाच्या तयारीला लागले. त्यांनी गर्द झाडीत छान पैकी चूल मांडली. अरुण सरांच्या हाताचे सूप प्यायला खरोखर भाग्य लागते. अप्रतिम बनवतात. या थंडीमध्ये सूप पिण्याची मजा काही औरच आहे. जेवणचा मेनू भात आणि दह्याची कडी. जेवण लवकर करून सर्व झोपायची तयारी करत होते. अरुणसर, प्रसाद, साबळेमामा, गोपाळमामा, सावळाराम आणि बजरंग हे चुलीच्या बाजूला झोपले होते. प्रकाशसर, झेन, राज, कुणाल आणि मी थोडे खालच्या बाजूला झोपलो होतो. काल रात्रीच्या थंडीच्या अनुभवामुळे आज सर्वानी अंगावर जेवढे म्हणून कपडे होते तेवढे चढविले. त्यामुळे थंडी फारशी लागली नाही. आम्हाला थंडी वाजत नव्हती हे अरुण सरांना संगितले पण हे काही त्यांना पटेनाच....!!


दुसरा दिवस उजाडला. सकाळच्या ६:३० वाजता प्रसाद व झेन यांनी कात्राबाईच्या माथ्यावर जाऊन अप्रतिम छायाचित्रे टिपली. अरुण सर नाश्ता आणि दुपारसाठी अंड्याच्या भुर्जीची सोय करत होते. भरभर चहा नाश्ता केला तेव्हा ८ वाजले होते. आता निघायलाच हवे. त्या कात्राबाईच्या अजस्र घळीतून खाली उतरण्यासाठी हार्नेस, हेल्मेट घालून आम्ही सर्वजण तयार झालो. अरुण सर आणि साबळे मामा पुढे होते. सुरुवातीलाच दोर लावावा लागला. साधारण ४०-४५ फूटांचा कातळ असावा. अरुण सरांनी योग्य ठिकाणी सर्व दोर फिक्स करायचे व प्रकाश सरांनी ते शेवटाला काढीत यायचे हे प्रत्येक मोहिमेला ठरलेलेच आहे. त्यामुळे त्यांचे काम यंत्राप्रमाणे सुरळीत चालू असते. त्यांचेमध्ये समन्वय छान आहे. शिवाय दोघांमध्ये अंतर पडले तरी सोबत चार वॉकी टोकि होतेच. खरच वॉकी टोकि मुळे आतापर्यंतच्या आमच्या मोहिमा सुरळीत पार पडल्या होत्या.
दोरावरून सर्वप्रथम ऱ्यापलींग करीत साबळे मामा उतरले. त्यांच्या मागोमाग अरुण सर, प्रसाद, मी, झेन, कुणाल, सावळेराम, बजरंग, गोपळ मामा, राज अन शेवटी प्रकाश सर हा क्रम शेवटपर्यंत राहिला. लगेच १५ मिनटात दुसरा कातळ ३५ -४० फूटाचा होता. प्रसाद पहिल्यांदा खाली उतरला त्यांच्या मागोमाग अरुणसर खाली उतरूले. त्या ठिकाणी त्यांना पाण्याचा छोटासा खड्डा दिसला. पण तो मातीने भरून गेला होता. सरांनी लगेच तो साफ करून ठेवला. त्यांच्या मागून येणाऱ्यांसाठी पाण्याची सोय झाली होती. कुणालने छान डोके लढविले. त्याच्या बाटलीतली स्ट्रो काढून त्याने अगदी मजेत पाणी पिले. सर्वांनी त्याचे अनुकरण केले.

तोपर्यंत अरुणसरांनी तिसऱ्या कड्यावरून दोर सोडला होता २० आणि ३० फूट असे दोन टप्प्यांमध्ये खाली उतरायचे होते. मागील मंडळी खाली उतरेपर्यंत आम्ही पुढे चालू लागलो. ३५० फुटांचा दोर प्रसादने माझ्याकडे दिला. मी व प्रसादाने आळीपाळीने तो दोर घ्यायचे ठरविले होते. त्यामुळे प्रसाद पुढे आणि मी प्रसादच्या मागून चालत होतो. लगेच चौथा कातळ लागला जो २० फूट होता थोडा ओलसरसा होता. प्रसादच्या मागोमाग मी खाली उतरलो. अरुण सर खुश दिसत नव्हते. कारण त्यांना हवा तसा खोल कडा अजून लागत नव्हता. खरे आहे ते ... वाघाला गवत खायला दिल्यासारखेच ते छोटे छोटे प्याच होते.






काही अंतर उतरल्यावर सर्वात पुढे असलेल्या प्रसादने लगेच ओरडून सांगितले "सर तुम्हाला हवा तसा प्याच मिळालाय.चांगला दीड दोनशे फुट खोल दिसतोय". अरुण सर खुश झाले. त्यांना पण हेच हवे होते. मोठा दोर लावावा लागेल अस मला पण वाटले. पण अरुण सर म्हणाले की जेमतेम ८०/९० फुटांचा असावा. मी व प्रसाद म्हणालो की नक्कीच १०० फुटांपेक्षा जास्त आहे सर. सर म्हणालेबघा हा साधारण १७० फुटांचा दोर मी डबल करून टाकतो. त्याचे एक टोक खाली पोहोचले की तुम्ही गिर्यारोहण सोडायचे. जर दोर नाही पोहोचला तर मी सोडणार. मी आणि प्रसाद म्हणालो लागली शर्थ सर ... साबळे मामा न्यायाधीश म्हणून उभे राहिले. मी देवाचा धावा सुरु केला. वाटेवर एक मोठ्ठाला दगड अडकला होता. अरुण सरांनी त्याच्या पलीकडून दोर खाली भिरकावला. आवाज काही आला नाही. आम्ही खुश झालो. पण तो नक्की पोहोचला की नाही हे त्या बोल्डरमुळे समजायला मार्ग नव्हता. एवढ्यात मागची सर्व मंडळी आली. दुपारचा दीड वाजला होता. "आधी जेवण उरकूयामग पुढे सरकू. जेवल्यानंतर पैजेचे काय ते बघू. तुमचा बहुतेक हा शेवटचा ट्रेक आहे. तेव्हा पोटभर खाऊन घ्या" अरुणसर म्हणाले. आम्ही म्हणालोसर तुम्हीच पोटभर खाऊन घ्या ....!!

 मी माझ्याकडची अंड्याची भूर्जीकोथिंबीर वडीबटाट्याची भाजीटोम्याटो सॉसब्रेड काढला. साबळे मामांनी गव्ह्च्या पिठाच्या गुळ टाकून गोड भाकऱ्या आणल्या होत्या. प्रकाश सरांनी थेपले काढले. अरुण सरांनी मस्तपैकी मांदेली तळून आणली होती. ते प्रत्येक मोहिमेला तळलेली मच्छी आणतातच. मागे कुरंग,मदन,अलंग,रतनगड ट्रेकला त्यांनी तळलेली पापलेटहलवा व सुरमई आणली होती. आमची चांगलीच मजा झाली. पण आज मात्र मला जेवण गोड लागत नव्हते. कारण जर का दोर खाली पोहोचला तर मला व प्रसादला गिर्यारोहण सोडावे लागणार होते.....!





जेवण झाले....! मी खूप आतुर होतो तो दोर नक्की खाली जाणार की नाही हे बघायला. अरुण सरांनी दोर दगडाच्या आतल्या बाजूने खाली सोडला तेव्हा तो खाली जमिनीला सहज टेकला. झाले ... आम्ही हरलो होतो. प्रकाश सर म्हणाले "अरे ज्याचे आयुष्यच सह्याद्रीत गेले त्याचेशी काय च्यालेंग लावता." झाले आता आम्हाला सर्वजण चिडवू लागले.
त्या कड्याखाली समोरच वेगळा असा एक १०० फुटांचा अजिक्य सुळका दिसत होता. जो अजून पर्यंत कोणीच सर् केलेला नव्हता. आम्ही सर्वजण तो शेवटचा कडा उतरलो. सुळक्याचे नीट निरीक्षण केल्यावर साबळेमामांनी त्याचे नामकरण केले "रांजण".. सर अगदी रांजणा सारखाच दिसतो बघा. बहुतेक फेब्रुवारीत येऊया याच्यावर चढाई करायलाअरुणसर म्हणाले.

मुख्य घळ संपून आता tree line सुरु झाली. आता फक्त नदीच्या कोरड्या पात्रातून खाली खाली उतरयाचेच होते. अरुण सरांनी प्रसादसाबळे मामागोपाळ मामाबजरंगसावळेराम यांना पाण्याचे ठिकाण शोधण्यासाठी पुढे पाठविले. मीही त्यांना गाठण्यासाठी भरभर चालू लागलो. पण माझ्याकडे ३५० फुटांचा वजनदार दोर होता. त्यामुळे जमत नव्हते. तासभर चालल्यावर एके ठिकाणी प्रसाद बसलेला दिसला. मागची मंडळी खूप मागे राहिल्याचे त्याला वॉकी टोकि वरून कळाले. मी म्हटले तू इथेच थांब. अजून अंधार पडायला पंधरा मिनिटे आहेत. तोवर पुढे जाऊन पाणी सापडते काय मी बघतो. कारण पाणी मिळाले नाही तर आपले चांगलेच हाल होणार होते. कारण दुसरे दिवशी आम्हाला अजून एका नवीन वाटेचा शोध घ्यायचा होता.





प्रसाद कडे मोठा दोर सोडून मी व गोपाळमामा धावतच निघालो. आमच्याकडे वेळ फारच थोडा शिल्लक होता. बरेच अंतर धावल्यावर नदीमध्ये एके ठिकाणी पाण्याचा साठा दिसला अन आम्ही दोघेही खूष झालो. अगदी जीवाच्या आकांताने ओरडून आम्ही मागच्यांना पाणी सापडल्याचे सांगितले. खरंच .. पाणी म्हणजे जीवन ... पाणी म्हणजे जीवन....!!

आता पूर्णपणे अंधार पडला होता. प्रकाशसर, राज, झेनोष खूपच मागे होते. सुदैवाने त्यांचेकडे वॉकी टोकि होता त्यामुळे चिंता करण्याचे कारण नव्हते. तरी मी व प्रसाद त्यांना आणण्यासाठी उलटे निघालोच. तसे एवढी मोठाली दरी एका दिवसात उतरून सर्वजण चांगलेच दमले होते. साडेचार हजार फुटांवरून आम्ही नऊशे फुटांवर आलो होतो.साधारण २० ते २५ मिनटातच त्यांची भेट झाली. पाण्याच्या जवळ जाईपर्यंत अरुण सरांनी दोन चुली पेटवून अवघ्या एका तासातच साग्रसंगीत जेवण तयार केल होत. आल्या आल्या गरम गरम चहा मिळाला. नंतर थोड्या गप्पा व दुसरे दिवशीची आंखणी झाली. झेनोश ने आम्हाला GPS ची छान माहिती दिली. या मोहिमेत आमच्याकडे दोन GPS होते. एक अरुणसरांचा व दुसरा झेनोशचा.

 भात, फ्लोवर-मटारचा रस्सा, थेपले, चपाती, पापड, लोणचे अन तळलेली मांदेली. बेत चांगलाच जमला होता. आज झोपही मस्त लागणार होती. साडे चार हजार फुटांवरून आम्ही नऊशे फुटांवर येवून थडकलो होतो. त्यामुळे थंडीही कमी भासत होती. नदीच्या पात्रात आमच्यातील काहीजण झोपले तर पात्राच्या बाहेरच्या बाजूला सपाटीवर आम्ही कालची मंडळी झोपलो. रात्रीच्या त्या अंधारामध्ये वरती चांदण्याणकडे टक लावून बसायला मला फार आवडते. मी तरी तेच करत होतो. मोबाईल वरती काही मराठी अप्रतिम गाणी चालू होती ... अशा एकांतात भावगीते ऐकण्याची मजा काही औरच असते....!!

तिसरा दिवस उजाडला सकाळी ७:३० वाजलेतेव्हा अरुण सर माझ्या नावाने ओरडत होते. मटार-बटाट्याची भाजी व पिठले ठेवायला त्यांना माझ्याकडचा रिकामा डबा हवा होता. पण माझी काही झोप उडत नव्हती. तसा मी सकाळच्या झोपेसाठी आळशी आहे...! चुलीवरच्या उकळत्या चहाचा स्वाद नाकात शिरला अन मी तात्काळ उठलो. मस्त चहा-बिस्कीटाचा अन फरसाणचा स्वाद घेतला. एरवी मी घरी कधीच चहा घेत नाही. फक्त ट्रेकिंगला गेल्यावरतीच.सर्व सामान आवरायची तयारी जोरात चालू होती. अरुणसरांनी सांगितले "आपल्याला आज खूप घाई करावी लागणार आहे. सामारदला लवकरात लवकर पोचायला हवे. आपल्याला तो पुरातन रस्ता शोधून काढावा लागणार आहे. तेव्हा लवकर आवरा".

सर्वांचे सामान आवरले तरी माझे आपले चालूच होत. नाहीतरी मला दरवेळी उशीरच होतो. अरुणसरांच्या शिव्या खाल्ल्याशिवाय मलाही चैन पडत नसावी. झेनच्या बोलण्यावरून आम्हाला अजून २००० फूट वरच्या बाजूला जायचे होते. GPS चा ट्रेकिंग मध्ये खूपच फायदा होतो हे जाणवले. घ्या घळीतून १२ पायऱ्याचा रस्ता गेला होता ती घळ गोपळ मामांना ठावूक होती. कात्राबाईच्या माथ्यावरून त्यांनी ती आम्हाला दाखविली होती. नदीच्या डाव्या अंगाने बऱ्याच घळी वर जात होत्या. पण आम्ही ती शोधून काढलीच अन डाव्या हाताला जंगलात घुसलो. अरुण सरांचा उजवा पाय चांगलाच दुखत होता. काल उतरताना तो मुरगळला होता. त्यामुळे त्यांनी मला संगितले की आपल्याला वाट शोधायची आहे. तू व प्रसाद डाव्या अंगाने कारवीतून वाट काढत वर वर सरका. आम्ही उजव्या बाजूने वर जातो. चुकलो तरी आपल्या जवळ वॉकी टोकि आहेतच. तुम्ही चुकले तर तुम्ही गिर्यारोहण सोडायचे. आम्ही चुकलो तर आम्ही सोडू. आम्ही म्हटले चालेल सर ...!

वाट अशी नव्हतीच. प्रसादकडे दोर असल्याकारणाने त्याचे चांगलेच हाल होत होते. साधारण दीड तासानी आम्ही दोनही ग्रुप एकत्र भेटलो. तिथे सर्वांनी थोडा वेळ आराम केला आणि संत्री खाल्ली अरुण सरांनी ४-५ लिटर पाणी घेऊन लिंबू सरबत बनविले. आम्ही प्रत्येकी ४.५ ग्लास लिंबू-सरबत प्यालो. समोरच आम्हाला ती खिंड दिसत होती. आत्ता बराचसा पल्ला आम्ही गाठला होता. जुनी वाट असल्यासारखी जाणवत होती. पण बरीच वर्षे रस्ता तुटला होता.

अर्ध्या तासामध्ये आम्ही खिंडीच्या तोंडाला जाऊन पोहोचलो अन खूप आनंद वाटला. समोर रतन गडाची भिंत दिसत होती. "त्या तिथे डाव्या अंगाला रतन गडाच्या तुटलेल्या पायऱ्या आहेत. जिथून चार वर्षांपूर्वी आम्ही दोर लावून राय्पलिंग केले होत. ही १२ पायऱ्यांची वाट तिथेच जावून पोहोचते. आपण अगदी बरोबर आलोत" अरुण सरांनी माहिती दिली अन सर्वांच्याच चेहऱ्यावर समाधान पसरले.

इथून पुढची वाट सपाटीची होती. रतन गडाला उजव्या अंगाला ठेवत traverse मारत मारत जायचे होते. अर्ध्या तासाने एका माळरानावर पोहोचलो. तिथून आजोबासीतेचा पाळणाडेहेणेसाकुर्ली गावे दिसली. हे सर्व दुष्य बघण्या लायक होते. थोड पुढे चालत गेल्यावर घळीमध्ये छानपैकी वाहते पाणी मिळाले. तिने जेवण करायचे ठरले. तिथून “बाण“ ह्या सुळक्याचे प्रथम दर्शन झाले. त्या सुळक्या विषयी बरेच ऐकले होते. पण प्रथमच पहात होतो. राज बाकरे म्हणाला की सर या सुळक्यावर चढाई करण्याची खूप खूप इच्छा आहे. केव्हा जायचे बोला. "मी पण येणार तुमच्या बरोबर" मी लगेच माझी सीट बुक केली. अरुणसर म्हणाले "अरे काल तुम्ही पैज हरला आहात हे विसरलात काय ... या ट्रेक नंतर गिर्यारोहणाला सोडा चिठ्ठी देणार असे तुम्हीच कबुल केले होते. त्याचे काय?" त्यावर प्रकाश सरांनी सांगितले "टीव्ही वर जसे हरलेल्यांना "call back round" ला बोलावतात तसे आपण यांनाही बोलवूया. जाऊंदेलहान मुले आहेत. एक संधी देऊया". अरुणसर आम्हाला म्हणाले "चलो तुमको छोड दिया" Thanks to Prakash sir....!

पाण्यापाशी जेवण उरकून घेतले. मी खास तिसरया दिवसासाठी शिल्लक ठेवलेल्या कोथंबीरीच्या वड्या काढल्या. थेपलेपिठलेमटार-बटाट्याची भाजीब्रेंड आणि सॉस. जेवण झाल्यानंतर दहा मिनिट आराम केला. समोरच सामरद गाव दिसत होते. तेव्हा तीन वाजले होते. मला तर लवकर निघायचय होते. कारण भांडारदरा पर्यंतचा रोड थोडा खराब होता. तो दिवसा उजेडी पार करणे महत्वाचे होते. परत एकदा बाण सुळक्याने खतरनाक दर्शन दिले. राजच्या सांगण्यावरून सुप्रसिद्ध प्रस्तरारोहक “किरण आडफडकर” सर यांनी तो सर केला होता. चार वाजता आम्ही सामरद गावात पोहोचलो. प्रत्येकाने आपापल्या sack मधली equipment काढून अरुणसरांच्या गाडीत भरली अन यशवंताकडचा चहा पिउन गाड्या मुंबईच्या दिशेने दामटल्या. रात्री १० च्या सुमारास आम्ही सर्व मुंबईमध्ये सुखरूप पोहोचलो.

हे सर्व शक्य झाले त्यामध्ये महत्वाचा वाटा होता अरुणसरप्रकाशसरराज बाकरेझेनोश पटेलप्रसाद सामंतकुणाल आंबेरकर आणि मी. त्याचबरोबर सामरदचे गोपाळमामासावर्णेचे साबळेमामापांचनईचे सावळेराम व बजरंग हे गावकरीही या अनोख्या मोहिमेत सामील झाले होते. आतापर्यंतच्या अरुण सरांबरोबर मी भाग घेतलेल्या शोधमोहिमांमधील हा सर्वात मजबूत संघ होता .... !!

अगर तुम सच्चे दिलसे किसिको पाना चाहते होतो पुरी कायनात तुम्हारी मदत मे लग जाती है

“When you really want something to happen, the whole world conspires to help you to achieve it”

Details:.............................................
Samrad - 747 mtrs (2450 feet)...........................................
Kathra pass top 1218 mts - (3996 feet) ...........................................
Campsite 1374 mts - (4507 feet) ...........................................
1st rappel start point 1355 mts - (4445 feet)...........................................
2nd rappel start pt 1289 mts - (4229 feet) ...........................................
3rd rappel start 1214 mts - (3982 feet) ...........................................
3rd rappel end 1192 mts - (3910 feet) ...........................................
4th rappel end 1182 mts- (3877 feet) ...........................................
5th rappel sttart 986 mts - (3234 feet) ...........................................
5th rappel end 963 mts - (3159 feet) ...........................................
Nite camp - 292 mts - (958 feet) ...................................................
Bara Pairacha rasta top 879 mts - (2883 feet).......................................



1st time Solo Range...2nd time Solo Trek...2nd time Lo-bhi




Fadu Experience...on 6th, 7th & 8th september, 2012.

लोणावला ते भीमाशंकर लो-भी नाव जेवढ छोट आहेट्रेक पण तेवढाच मोठा आहे. 
२०११ भाद्रपद(september) मध्ये विक्रम सिंग बरोबर हा ट्रेक केला होता आणि सुंदर फोटोग्राफी केली होती भरत छत्रे यांनी आणि लो-भी परिसरातील निसर्ग पण तेवढाच सुरेख आहे. तेव्हाच ठरवले की हा ट्रेक पुन्हा पुढच्या वर्षी करायचाच आणि तो पण भाद्रपद (September) मध्ये करायचा. कारण पण तसच होते त्या ट्रेक नंतर मला १२ महिन्यामाध्ये सह्याद्रीमध्ये मी जिथे कुठे फिरलो तिथे तसा निसर्ग दिसला नाहीआणि त्या वाटा आणि दिशा शोधात जायची जी धम्माल असते ती तर अजून भारी. एका महिन्या पूर्वी आरखडा केलाआणि अश्याच मंडळी ना सागितला ते तो ट्रेक करू शकतात. प्रसाद सावंतयोगेश मेस्त्रीउज्वला विश्वासरावभूषण गुरवसागर दळवीसाधना चंदनशिवे. ट्रेकची तारीख होती ७ (September) रात्री मुंबई मधून निघायचं आणि ६ (September) सर्वच प्लान बोंबलला. त्यादिवशी फेसबूक वरती नेहमी सारखी संभाषण चालू होते जितेन पाटील याच्याबरोबर बोलणं चालू होत तर मी त्यांना विचारल ट्रेकला येणार काते बोले एका दिवसाचा असेल तर येतो. लो-भी तर एक दिवसात होणार नाही. मग विचारतात एकटा जाणार काआणि मला वेडच लागले मग काय मुकाट्यानं sack भरली.

    

 सगळं सामान नीट प्लास्टिकच्या पिशावीमधे गुंडाळन sack मध्ये कोंबलं. पण तरी पण मनात शंका होती. दिवसाच तर एकटे फिरायला काही नाहीपण रात्रीच ते पण एकटे. मग विचार केला आत्ता जायचं तर असच करायचं आणि काही वाटले तर लोणावला रेल्वे स्टेशनला झोप काढू. नेमका त्यादिवशी घरी झाला थोडा लोचा आई आणि बाबा बाहेर गेले आणि घरी उशिरा आले. मग ९:४५ ला जेवलो आणि जोगेश्वरी रेल्वेस्टेशनला गेलो १०:२० वाजता. आत्ता माझ काही खर नाही ११ ची शिर्डी ट्रेन मिळते कि नाहीअजून दादर ते लोणावला तिकित काढायचे होते. दादरला गेलो आणि ट्रेन आली मग तिकिट आत्ता राहुदे. ट्रेन नुसतीच पकडायची नाही होती तर ट्रेनमध्ये जागा पकडून झोप पण काढायची होती कारण दिवसभर झोप नाही होती. ११:१० वाजता शिर्डी ट्रेन पकडली आणि २:१० ला लोणावला रेल्वे स्टेशनला उतरलो. समोरच रेल्वे पोलीस आत्ता बोलो लागली वाट पण  त्यांनी काही विचारपूस नाही केली. समोर काही माणसे तिथेच झोपली होती विचार केला झोपून लवकर सकाळी गेलो तर भिमाशंकरला रविवारी खूप उशीर होणारमग तोंडा वरती पाणी मारले आणि एका काकाकडून चिक्की घेतली तसाच St Stand वरती गेलो तर पाऊस चालू झाला. थोडा वेळ वाट बघितली पाऊस जायची तेवढ्यात ३:०० वाजले. मला जास्त उशीर करून नाही चालनार मग रेनकोट काढला आणि प्लास्टिकच्या पिशवी मध्ये कोयता sack आणि पाठानीच्या जागेमध्ये ठेवला. मोबोईल वगैरे सर्व सर्व बंद केल पहिला टप्पा मला गाठायचा होता तुगारलीचे धरणच्या बाजूने जाऊन वाळवडमध्ये जावून मस्तपैकी झोप काढता येयील अस विचार होता धरणवरती खूप भारी हवा लागत होती थोडा वेळ थांबलो देखील आत्ता दुसरा टप्पा तुगारलीची वस्ती गेलो तेव्हा कुत्रे आमच्या स्वागतासाठी होतेचतिसरा टप्पा राजमाचीचा फाटा हा माझ्यासाठी रात्रीच्या वेळेमधला सर्वात जास्त कंटाळवाणा रस्ता होता किती वेळ झाला तरी फाटा येत नाही आत्ताच येईल मगच येईल करत करत एकदा राजमाचीचा फाटा आला तेव्हा मी दम टाकला मोबोईल चालू केला वेळ बघून खुश झालो ५:१० वाजले होते आत्ता काय १० ते १५ मिनट बाकी आहेत वाळवडसाठी म्हणून निघालो पण हा रस्ता काही संपेना चुकलो कि काय शंका आली मनांत मागे एक वाट उजव्या दिशेला वरती गेली होती पुन्हा मोबोईल चालू केला वेळ बगीतली तर ५:३० झाले होते काही तरी गडबड झाली मग तसच मागे गेलो एका ठिकाणी वाट वरच्या बाजूला गेली होती तिकडे एक गाव होते थोडाफार उजेड झाला होता. एका घरातून काही तरी आवाज येत होता तिथूनच आवाज दिला हो मामा? तर ते बाहेर आले त्यांना विचारले वाळवड कुठे आहे. ते बोले हि खालची वाट सरळ जाते २० मिनिट लागतील मी बोललो मी जावून आलो २० मिनिटाच्या वाटेवरती कुठेच गाव दिसला नाही पण ते बोललो तेव्हा धीर आला मग गाडी पुन्हा चालू केली ज्या वाटेतून परत आलो होतो तिथे गेलो आणि बघतो तर काय जिथून मी मागे फिरलो तिथून ५० फूट वरती एक बोर्ड होता तेच वाळवड गाव होत. आत्ता थोडा वेळ झोपून ट्रेक चालू करायचं होता ६:३० झाले मोबोईल वरती अलार्म लावला ७:३०चा आणि झोपी गेलो....







अलार्म झाला तसाच गेलो बाजूच्या घरात थोडे पाणी मागितले पण ते तोंडावरती मारायाला त्यांनी चहा पण दिला. त्यांना थोडीफार विचारपूस करून ढाक भैरीच्या वाटेला चालत होतो कोयता आत्ता sack मध्ये ठेवला पण तो पण असा कि वेळेला कधी हि बाहेर निघेल. जुन्या आठवी ताज्या झाल्या त्या मोठ्या नाल्याच्या काटावरतून जात असताना. खर तर त्याला नाला बोलन पण चुकीच आहे कारण जे पाणी तिथे होते ते बिसलरीच्या पाण्यापेश्या कितीतरी चागले होतेसमोरच धबधबा होता त्याला न्याहळत चालत होतो. आत्ता काहीतरी खाव अस वाटले पण नंतर विचार केला कि वेळ वाया नाही घालवयाचा. कुठेही न थाबता लवकरात लवकर कुसूरच्या पाठारावर जावून काही तरी खाव अस विचार केला. पण ढाक अजून दिसला नाही तर कुसूर कधी येणार लवकर लवकार चालायला सुरवात केली आणि समोर ढाक दिसू लागला ढाकच्या दिशने चालत होतो लवकरच मी त्या पाटी जवळ पोचलो महिलांना सक्त मनाई आहे” आत्ता ढाकला डाव्याहाताला ठेवून वरती गेलेल्या वाटेने सरळ कुसूरच्या पाठारावर जायचं होते. विचार करत करत चाललो होतो काय होणार कुसुरच्या दुसऱ्या टप्प्यामध्ये पहिला टप्प्या बऱ्यापैकी माहित होताआणि चालता चालता एकदास कुसुरच पाठार चालू झाले. धनगरवाडीच्या तिकडे एक मोठा इलेक्ट्रोनिक टौंवर दिसला खुश झालो मी दिशामध्ये थोडा कच्चा आहे. आत्ता काय सरळ चालत राहायचं आहे हे माहित होते पण तरी पण मानामध्ये भीती होती ह्या पाठारावर दूरपर्यंत कोणाची वस्ती नाही आहे फक्त एकच घर आहे. धनगरवाडीमधे ते पण उजव्या हाताला बरासच दूर. स्वताशीच बोलन चालू होतो पण आत्ता भीतीचे घर माझ्या मनातून खूप लांब गेल होते. रात्री ३ ते सकाळी ६:३० पर्यंत चालो तेव्हा काही नाही झाल आणि आत्ता काय होणार आहे. कुसुरचे पठारावर अर्धा टप्पा पूर्ण केला समोरच मोठी वाहळ लागली गेल्या वर्षी पण इथेच बसून जेवण केले होते पण आत्ता जेवायला वेळ नाही होता sack मधून आईनि दिलेला पोह्याचा तिखट-गोड चिवडा काढला आणि लगेच sack बंद करून गाडी चालू केलीआत्ता खरी धम्माल होती मला पुढचे काहीच आठवत नव्हते मग आत्ता काही झाल तरी वाट सोड्याची नाही अस निर्धार केला. चालता चालता एक अजून छोटी वाहळ लागली ती ओलाडायाच्या आधी उजव्या हाताला झाडातून थोडासा विचित्र आवाज आला. जसा रेडा ओरडतो तसा पण एकदम कमी आवाज आला. मी पुन्हा तिकडे थोडी नजर फिरवली पुन्हा तसाच आवाज आला. मग मी तिथून पळ काढला आणि त्या गडबडीत समोरची वाट गायब झाली आत्ता कुसुरच्या दुसऱ्या टप्प्यामध्ये भलताच अडकलो होतो मग नाकाशा बघितला पायाखाली दोन दगडी होत्या एकावर्ती एक अजून तरी बरोबर आहे हे समजले. पण पुन्हा कुठे तरी अश्या ठिकाणी घुसलो कि तिथून बाहेरच पडला येत नव्हते. जवळ जवळ १ तास इकडून तिकडे जातोय पण एकाच ठीकाणी येत होतो. मग वाट बदलून सरळ जावून बघावं बोलो तर तिथे एक वाट दिसली जी डाव्याहाताला जगलात जात होती. जोरात श्वास सोडला आणि गाडीचा टॉप घेअर टाकून पुन्हा जोरात चालू केली एकदासा बरोबर रस्त्याला लागलो होतो. आत्ता थेट सावळे गावात जावून जेवण करू अस विचार केला.










   
अजून बरासचा टप्पा बाकी होता एका ठिकाणी सावळे गावातले एक मामा दिसले ते विचारतात तू एवढा मागे कसा राहिलास” मी पुन्हा त्यांना विचारल कायतेव्हा बोलतात तुझे मंडळी तुला टाकून पुढे कशी गेली?” तेव्हा त्यांना विचारले कि किती वेळ झाला आणि किती जन आहेतते बोले अर्धा तास झाला आणि ५ ते ६ जन आहेत आणिक एक पोरगी पण आहे. हे माझ्यासाठी चागली बातमी होती कि वाईट मलाच माहित नाही. आत्ता मी अजून जोरात चायला लागलो सावळे ते खांडी गाडीने जाता येणार म्हणून खाली उतरून एक घरच्या बाहेर असणाऱ्या लहान मुलाला विचारले कुठे गेले ते माणसे त्यांनी हात वरती करून St Stand कडे इशारा केला तेव्हा aaaoooo आवाज दिला तेव्हा हि मंडळी नजरेस पडली.............


      गावात रस्तावर्ती जावून aaaoooo आवाज दिला हातामाध्यला दोन्ही कट्या वरती करून त्यांना इशारा केला तेव्हा ते पण चक्कीत झाले अरे हा कोणविजय नागोणकर ह्याची सर्व मंडळी मुंबई व अलिबागचे होते. नेमेकी एका छोटा टेम्पो आला त्या गाडी चालकाची कृपा म्हणून त्यांनी आम्हाला सावळे पर्यंत सोडायच कबुल केल. मग टेम्पोमध्ये बसलो चर्चा चालू झाली एकटा कसा आलास तूकधी निघालासभीती नाही का वाटलीमी खूप थकलो होतो मी कुसुरच्या पाठाराच्या नंतर कुठेच थांबलो नव्हतो. तेव्हा दुपारचे २ वाजले होते तब्बल १० तास चालून थकलो होतो मग मी विचारल तुमच जेवण झाल आहे काते बोले हो आम्ही जेवण केल आहे. मला तर खूप भूक लागली होती. गाडी सावळेला थांबली. मग जेवण कराव कि ह्याच्या बरोबर जायचं हा विचार केला. ते सर्व बोले चल आत्ता थोड पुढे जावून बसूया तेव्हा कर जेवण मग विचार केला ठीक आहे. एका ठिकाणी अर्ध्या तासात बसलो मी माझ जेवण करून घेतले  जरा बर वाटले तेव्हा कुठे गाडीमध्ये पेट्रोल गेल्यासारखा वाटलं . तेव्हा ही मंडळी थोडे पुढे गेली होती आत्ता टार्गेट होते वांद्रे खिंड डाव्याहाताला. त्याच्याबरोबर बोलन झाल थोड फार तेव्हा ते बोलले चाल पुढे तू आम्ही हळू हळू येतो मग विचार केला आत्ता वांद्रे खिंडीत ह्याची वाट बाघायची. चालत होतो एकटाच पुन्हा झाली ना गफलत पण आत्ता मी थोडा आनंदी होतो. वाटेवरून पुन्हा एकदा भटकलो गफलत अशी झाली कि जी उजव्याहाताची पवनचक्की मी टार्गेट केली होती. तिथे थोडे ढग तिच्या समोर आले तेव्हा मी गडबडलो डाव्याहाताच्या पवनचक्कीकडे गेलो पण नंतर पुन्हा एकदा खाली आलो आणि नजर फिरवली तेव्हा तिच्या डाव्याहाताची पवनचक्की दिसली मला माहित होते कि मी बरोबर बाहेर पडणार पण हि मंडळी पुढे जाणार अस वाटले आणि काही तरी गडबड होणार मग पुन्हा एकदा गाडी चालू केली आत्ता खिंड एकदम समोर दिसत होती. कधी नव्हे ते पहिल्यांदा माझ्या अचानक दोन्ही ढोपारामध्ये cramp आला. थोडा वेळ sack सोडून बसलो. तेव्हा ह्या मंडळीना आवाज दिला पण हू नाही कि सु” मग मला वाटले कि खूप मागे पडलो आहे. खिंड आत्ता मी ओलांडली होती खाली २-३ वाडे आहेत त्यांना विचारल कोणी गेल का पढरवाडी कडे तर ते बोले कोणीच दिसले नाही. आत्ता टार्गेट पढरवाडी होते १५-२० मिनटात पोहोचणार हे माहित होते पण तरी ही मंडळी कुठे राहिली त्याची वाट बघावी कापण हे काही रस्ता चुकणार नाही होते मग राहिले कुठे. पढरवाडीला मी पोचलो. तिथे विचारपूस केली कोणी मंडळी आली आहे कातेव्हा ५ वाजले होते. मग मंदिरात sack ठेवून विहीर गाठली. आणि गावातला एक मुलगा मला बोलवायला आला तुमची लोक आलेत हा........जरा अजून बर वाटले. मग विचारपूस झाली का उशीर झाला तुम्हाला वगैरे. चहाची सोय पण झाली आता जेवायची तयारी करायची होती. घरी फोन करून आईला सागितलं मी एका गाव मध्ये आहे. गावामध्ये कोंबडा आहे का त्याची विचारपूस झाली आणि ४५० रुपयांना दोन कोंबडे आम्ही घेतले. रातीच जेवण ९ वाजता झाल आणि लवकर मस्त झोप लागली.......

      सकाळी ७ वाजले होते तेव्हा जाग आली लवकर तयारी करून मला निघायचं होते. ही मंडळी त्या दिवशी पण भीमाशंकरच्या खाली जिथे गणेश घाट व शिडी घाट वेगळा होतो तिथे राहणार होते पण मला भीमाशंकर करून मुंबईला घरी जायचं होते गावातून २ लिटर दुध घेतलं होत. मग सकाळचा चहा नाश्ता झाला. दुध अजून बाकी होतरात्रीच्या भात बाकी होतारस्सा पण बाकी होता. मग सर्वानी पुन्हा ताव मारला मी तर दुध भाता खाल्ला. माझ्या आत्ता पर्यंतच्या ट्रेकिंग मधला सर्वात जास्त नाश्ता ह्या ट्रेकला केला. Sack भरायला चालू केली लवकरच बाहेर निघालो तेव्हा ८:१५ वाजले होते. अजून ४ ते ५ तास लागणार भीमाशंकरला जायला हे माहित होते. मग चालू झाला दुसरा दिवस आत्ता मी त्या मंडळी बरोबर चालत होतो पुढे एक मातीचा रस्ता लागला कि मी त्यांना सोडून जाणार होतो. पण तिथे गेलो तेव्हा मोबाईल चालू केला घरी आईला निरोप सागितला. आत्ता Sackमध्ये अज्जिबात पाणी नाही मग पाणी भरून घेतलं तोपर्यंत हे खूप पुढे निघून गेले होते. आत्ता पुन्हा त्यांना गाठून पुढे जायचं होते परंतु इथे काही मंडळी खूप पुढे निघाली होती आत्ता त्यांना सांगायला गेलो तर तिथून पेठच दर्शन झाल. अर्धी मंडळी पुढे जायचे कारण पण तसच विशेष होत  थोडा रस्सा डब्यांमध्ये भरून घेतला होता भात पण बाकी होता. माझ्या Sack मध्ये ब्रेड होते मग काय पुन्हा चालू झालो. मला लवकर आवरून गाडी चालू करायाची होती. आता भेट थेट कमळजाईच्या मंदिर जवळ करायची इच्चा माझी होती मी पुढे गेलो. मला खेकड्यांचे भारी वेड आहे. कमळजाईच्या च्या पठारावर मी खूप वेळ खेकडे पकडून सोडत होतो पण त्यात जास्त काही मज्जा नाही आली मोठे खेकडेच दिसले नाहीत. शेवटी थेट  निघालो भीमाशंकरला पोहोचायचे म्हणून १२ वाजले होते. तिथे मागची मंडळी  पुन्हा एकदा जवळ आली शेवटी मी एकत्र चालत होतो भीमा नदी ओलाडेपर्यंत मग सर्वाची भेट घेवून मी १ वाजत पुन्हा एकदा एकटा निघालो भीमाशंकर मंदिर गाठायला. १:३० वाजला होता भीमाशंकरला लांबूनच नमस्कार करून घरच्यासाठी प्रसाद घेतला. शिडीघाटाने खाली जायचं ठरवले तेव्हा २ वाजले होते शिडीघाटाने खाली जाण्याची ही पहिली वेळ होती. गेल्या महिन्यामध्येच भीमाशंकरला शिडीघाटाने वरती गेलो होतो काही भाग शेवाळलेला असणार हे माहित होते पण गणेशघाटाने वेळ जास्त लागणार मग कश्याला पाहिजे गणेशघाट अस बोलत शिडीघाट चालू झाला पहिलाच धबधबा मग Sack बाजूला काढून थोडा भिजलो मग उतरायला चालू केल पण एका ठिकाणी जो काय पाय घसरला मग तेव्हा थोडी उदास झाली होती सर्व ट्रेक मध्ये सर्वात जास्त उदास शिडीघाटाने खाली उतरताना झाली होती. तरी हळू हळू उतरत होतो ४ वाजता बरोबर गणेशघाटाकडून येणारा रस्ता आणि शिडीघाटाकडून येणाऱ्या रस्त्यावरती आलो तेव्हा खूप आनंदी झालो. पहिले फोन करून घरी सागायचं होत आणि दुसरा फोन करायचं होता त्या जितेन पाटलाला......ज्यांनी ही कल्पना सुचवली त्याला ट्रेकला जाताना काही टिप्स व नकाशा घेवून गेलो होतो एक पेपर वरती प्रिंट काढून. 

Arun Sir-9869474343

Vikram Singh TMI-9987761562, 8652028262
Jiten Patil-9987798479
My home 9967250989,9699673281,28209237.

Self-9221831364,7276574971.


     

  Tugarli To valvand. valvand to kusur 7 hrs by walking. Kusar to khandi 5 km .khandi to savle 7km. savle gaon to vandre khind 2:30 hrs. Take left side turn towards one vilaage (paderwadi). then kamalji temple 3 hrs. near bhima rever.  need to cross river 2 time. after one ascending 45 min you will reach bhimashanakr 

HDFC bank, Tugarli damp Right side la……ek gaon lagel .gavatun saral pude jayach ahe rajmachi cha path ahe. Tithun Right turn valavand gaon ahe…happy journey.....:)