Fadu Experience...on 6th, 7th & 8th september, 2012.
लोणावला ते भीमाशंकर लो-भी नाव जेवढ छोट आहे, ट्रेक पण तेवढाच मोठा आहे.
२०११ भाद्रपद(september) मध्ये विक्रम सिंग बरोबर हा ट्रेक केला होता आणि सुंदर फोटोग्राफी केली होती भरत छत्रे यांनी आणि लो-भी परिसरातील निसर्ग पण तेवढाच सुरेख आहे. तेव्हाच ठरवले की हा ट्रेक पुन्हा पुढच्या वर्षी करायचाच आणि तो पण भाद्रपद (September) मध्ये करायचा. कारण पण तसच होते त्या ट्रेक नंतर मला १२ महिन्यामाध्ये सह्याद्रीमध्ये मी जिथे
कुठे फिरलो तिथे तसा निसर्ग दिसला नाही, आणि त्या वाटा आणि दिशा शोधात जायची जी धम्माल असते ती तर अजून भारी. एका महिन्या पूर्वी आरखडा केला, आणि अश्याच मंडळी ना सागितला ते तो ट्रेक करू शकतात. प्रसाद सावंत, योगेश मेस्त्री, उज्वला विश्वासराव, भूषण गुरव, सागर दळवी, साधना चंदनशिवे. ट्रेकची तारीख होती ७ (September) रात्री मुंबई मधून निघायचं आणि ६ (September) सर्वच प्लान बोंबलला. त्यादिवशी फेसबूक वरती नेहमी सारखी संभाषण चालू होते जितेन पाटील याच्याबरोबर बोलणं चालू होत तर मी त्यांना विचारल ट्रेकला येणार का? ते बोले एका दिवसाचा असेल तर येतो. लो-भी तर एक दिवसात होणार नाही. मग विचारतात एकटा जाणार का? आणि मला वेडच लागले मग काय मुकाट्यानं sack भरली.
सगळं सामान नीट प्लास्टिकच्या पिशावीमधे गुंडाळन sack मध्ये कोंबलं. पण तरी पण मनात शंका होती. दिवसाच तर एकटे फिरायला काही नाही, पण रात्रीच ते पण एकटे. मग विचार केला आत्ता जायचं तर असच करायचं आणि काही वाटले तर लोणावला रेल्वे स्टेशनला झोप काढू. नेमका त्यादिवशी घरी झाला थोडा लोचा आई आणि बाबा बाहेर गेले आणि घरी उशिरा आले. मग ९:४५ ला जेवलो आणि जोगेश्वरी रेल्वेस्टेशनला गेलो १०:२० वाजता. आत्ता माझ काही खर नाही ११ ची शिर्डी ट्रेन मिळते कि नाही, अजून दादर ते लोणावला तिकित काढायचे होते. दादरला गेलो आणि ट्रेन आली मग तिकिट आत्ता राहुदे. ट्रेन नुसतीच पकडायची नाही होती तर ट्रेनमध्ये जागा पकडून झोप पण काढायची होती कारण दिवसभर झोप नाही होती. ११:१० वाजता शिर्डी ट्रेन पकडली आणि २:१० ला लोणावला रेल्वे स्टेशनला उतरलो. समोरच रेल्वे पोलीस आत्ता बोलो लागली वाट पण त्यांनी काही विचारपूस नाही केली. समोर काही माणसे तिथेच झोपली होती विचार केला झोपून लवकर सकाळी गेलो तर भिमाशंकरला रविवारी खूप उशीर होणार, मग तोंडा वरती पाणी मारले आणि एका काकाकडून चिक्की घेतली तसाच St Stand वरती गेलो तर पाऊस चालू झाला. थोडा वेळ वाट बघितली पाऊस जायची तेवढ्यात ३:०० वाजले. मला जास्त उशीर करून नाही चालनार मग रेनकोट काढला आणि प्लास्टिकच्या पिशवी मध्ये कोयता sack आणि पाठानीच्या जागेमध्ये ठेवला. मोबोईल वगैरे सर्व सर्व बंद केल पहिला टप्पा मला गाठायचा होता तुगारलीचे धरणच्या बाजूने जाऊन वाळवडमध्ये जावून मस्तपैकी झोप काढता येयील अस विचार होता धरणवरती खूप भारी हवा लागत होती थोडा वेळ थांबलो देखील आत्ता दुसरा टप्पा तुगारलीची वस्ती गेलो तेव्हा कुत्रे आमच्या स्वागतासाठी होतेच, तिसरा टप्पा राजमाचीचा फाटा हा माझ्यासाठी रात्रीच्या वेळेमधला सर्वात जास्त कंटाळवाणा रस्ता होता किती वेळ झाला तरी फाटा येत नाही आत्ताच येईल मगच येईल करत करत एकदा राजमाचीचा फाटा आला तेव्हा मी दम टाकला मोबोईल चालू केला वेळ बघून खुश झालो ५:१० वाजले होते आत्ता काय १० ते १५ मिनट बाकी आहेत वाळवडसाठी म्हणून निघालो पण हा रस्ता काही संपेना चुकलो कि काय शंका आली मनांत मागे एक वाट उजव्या दिशेला वरती गेली होती पुन्हा मोबोईल चालू केला वेळ बगीतली तर ५:३० झाले होते काही तरी गडबड झाली मग तसच मागे गेलो एका ठिकाणी वाट वरच्या बाजूला गेली होती तिकडे एक गाव होते थोडाफार उजेड झाला होता. एका घरातून काही तरी आवाज येत होता तिथूनच आवाज दिला हो मामा? तर ते बाहेर आले त्यांना विचारले वाळवड कुठे आहे. ते बोले हि खालची वाट सरळ जाते २० मिनिट लागतील मी बोललो मी जावून आलो २० मिनिटाच्या वाटेवरती कुठेच गाव दिसला नाही पण ते बोललो तेव्हा धीर आला मग गाडी पुन्हा चालू केली ज्या वाटेतून परत आलो होतो तिथे गेलो आणि बघतो तर काय जिथून मी मागे फिरलो तिथून ५० फूट वरती एक बोर्ड होता तेच वाळवड गाव होत. आत्ता थोडा वेळ झोपून ट्रेक चालू करायचं होता ६:३० झाले मोबोईल वरती अलार्म लावला ७:३०चा आणि झोपी गेलो....
अलार्म झाला तसाच गेलो बाजूच्या घरात थोडे पाणी मागितले पण ते तोंडावरती मारायाला त्यांनी चहा पण दिला. त्यांना थोडीफार विचारपूस करून ढाक भैरीच्या वाटेला चालत होतो कोयता आत्ता sack मध्ये ठेवला पण तो पण असा कि वेळेला कधी हि बाहेर निघेल. जुन्या आठवी ताज्या झाल्या त्या मोठ्या नाल्याच्या काटावरतून जात असताना. खर तर त्याला नाला बोलन पण चुकीच आहे कारण जे पाणी तिथे होते ते बिसलरीच्या पाण्यापेश्या कितीतरी चागले होते, समोरच धबधबा होता त्याला न्याहळत चालत होतो. आत्ता काहीतरी खाव अस वाटले पण नंतर विचार केला कि वेळ वाया नाही घालवयाचा. कुठेही न थाबता लवकरात लवकर कुसूरच्या पाठारावर जावून काही तरी खाव अस विचार केला. पण ढाक अजून दिसला नाही तर कुसूर कधी येणार लवकर लवकार चालायला सुरवात केली आणि समोर ढाक दिसू लागला ढाकच्या दिशने चालत होतो लवकरच मी त्या पाटी जवळ पोचलो “महिलांना सक्त मनाई आहे” आत्ता ढाकला डाव्याहाताला ठेवून वरती गेलेल्या वाटेने सरळ कुसूरच्या पाठारावर जायचं होते. विचार करत करत चाललो होतो काय होणार कुसुरच्या दुसऱ्या टप्प्यामध्ये पहिला टप्प्या बऱ्यापैकी माहित होता, आणि चालता चालता एकदास कुसुरच पाठार चालू झाले. धनगरवाडीच्या तिकडे एक मोठा इलेक्ट्रोनिक टौंवर दिसला खुश झालो मी दिशामध्ये थोडा कच्चा आहे. आत्ता काय सरळ चालत राहायचं आहे हे माहित होते पण तरी पण मानामध्ये भीती होती ह्या पाठारावर दूरपर्यंत कोणाची वस्ती नाही आहे फक्त एकच घर आहे. धनगरवाडीमधे ते पण उजव्या हाताला बरासच दूर. स्वताशीच बोलन चालू होतो पण आत्ता भीतीचे घर माझ्या मनातून खूप लांब गेल होते. रात्री ३ ते सकाळी ६:३० पर्यंत चालो तेव्हा काही नाही झाल आणि आत्ता काय होणार आहे. कुसुरचे पठारावर अर्धा टप्पा पूर्ण केला समोरच मोठी वाहळ लागली गेल्या वर्षी पण इथेच बसून जेवण केले होते पण आत्ता जेवायला वेळ नाही होता sack मधून आईनि दिलेला पोह्याचा तिखट-गोड चिवडा काढला आणि लगेच sack बंद करून गाडी चालू केली, आत्ता खरी धम्माल होती मला पुढचे काहीच आठवत नव्हते मग आत्ता काही झाल तरी वाट सोड्याची नाही अस निर्धार केला. चालता चालता एक अजून छोटी वाहळ लागली ती ओलाडायाच्या आधी उजव्या हाताला झाडातून थोडासा विचित्र आवाज आला. जसा रेडा ओरडतो तसा पण एकदम कमी आवाज आला. मी पुन्हा तिकडे थोडी नजर फिरवली पुन्हा तसाच आवाज आला. मग मी तिथून पळ काढला आणि त्या गडबडीत समोरची वाट गायब झाली आत्ता कुसुरच्या दुसऱ्या टप्प्यामध्ये भलताच अडकलो होतो मग नाकाशा बघितला पायाखाली दोन दगडी होत्या एकावर्ती एक अजून तरी बरोबर आहे हे समजले. पण पुन्हा कुठे तरी अश्या ठिकाणी घुसलो कि तिथून बाहेरच पडला येत नव्हते. जवळ जवळ १ तास इकडून तिकडे जातोय पण एकाच ठीकाणी येत होतो. मग वाट बदलून सरळ जावून बघावं बोलो तर तिथे एक वाट दिसली जी डाव्याहाताला जगलात जात होती. जोरात श्वास सोडला आणि गाडीचा टॉप घेअर टाकून पुन्हा जोरात चालू केली एकदासा बरोबर रस्त्याला लागलो होतो. आत्ता थेट सावळे गावात जावून जेवण करू अस विचार केला.
अजून बरासचा टप्पा बाकी होता एका ठिकाणी सावळे गावातले एक मामा दिसले ते विचारतात “तू एवढा मागे कसा राहिलास” मी पुन्हा त्यांना विचारल काय? तेव्हा बोलतात “तुझे मंडळी तुला टाकून पुढे कशी गेली?” तेव्हा त्यांना विचारले कि किती वेळ झाला आणि किती जन आहेत? ते बोले अर्धा तास झाला आणि ५ ते ६ जन आहेत आणिक एक पोरगी पण आहे. हे माझ्यासाठी चागली बातमी होती कि वाईट मलाच माहित नाही. आत्ता मी अजून जोरात चायला लागलो सावळे ते खांडी गाडीने जाता येणार म्हणून खाली उतरून एक घरच्या बाहेर असणाऱ्या लहान मुलाला विचारले कुठे गेले ते माणसे त्यांनी हात वरती करून St Stand कडे इशारा केला तेव्हा aaaoooo आवाज दिला तेव्हा हि मंडळी नजरेस पडली.............
गावात रस्तावर्ती जावून aaaoooo आवाज दिला हातामाध्यला दोन्ही कट्या वरती करून त्यांना इशारा केला तेव्हा ते पण चक्कीत झाले अरे हा कोण? विजय नागोणकर ह्याची सर्व मंडळी मुंबई व अलिबागचे होते. नेमेकी एका छोटा टेम्पो आला त्या गाडी चालकाची कृपा म्हणून त्यांनी आम्हाला सावळे पर्यंत सोडायच कबुल केल. मग टेम्पोमध्ये बसलो चर्चा चालू झाली एकटा कसा आलास तू, कधी निघालास, भीती नाही का वाटली? मी खूप थकलो होतो मी कुसुरच्या पाठाराच्या नंतर कुठेच थांबलो नव्हतो. तेव्हा दुपारचे २ वाजले होते तब्बल १० तास चालून थकलो होतो मग मी विचारल तुमच जेवण झाल आहे का? ते बोले हो आम्ही जेवण केल आहे. मला तर खूप भूक लागली होती. गाडी सावळेला थांबली. मग जेवण कराव कि ह्याच्या बरोबर जायचं हा विचार केला. ते सर्व बोले चल आत्ता थोड पुढे जावून बसूया तेव्हा कर जेवण मग विचार केला ठीक आहे. एका ठिकाणी अर्ध्या तासात बसलो मी माझ जेवण करून घेतले जरा बर वाटले तेव्हा कुठे गाडीमध्ये पेट्रोल गेल्यासारखा वाटलं . तेव्हा ही मंडळी थोडे पुढे गेली होती आत्ता टार्गेट होते वांद्रे खिंड डाव्याहाताला. त्याच्याबरोबर बोलन झाल थोड फार तेव्हा ते बोलले चाल पुढे तू आम्ही हळू हळू येतो मग विचार केला आत्ता वांद्रे खिंडीत ह्याची वाट बाघायची. चालत होतो एकटाच पुन्हा झाली ना गफलत पण आत्ता मी थोडा आनंदी होतो. वाटेवरून पुन्हा एकदा भटकलो गफलत अशी झाली कि जी उजव्याहाताची पवनचक्की मी टार्गेट केली होती. तिथे थोडे ढग तिच्या समोर आले तेव्हा मी गडबडलो डाव्याहाताच्या पवनचक्कीकडे गेलो पण नंतर पुन्हा एकदा खाली आलो आणि नजर फिरवली तेव्हा तिच्या डाव्याहाताची पवनचक्की दिसली मला माहित होते कि मी बरोबर बाहेर पडणार पण हि मंडळी पुढे जाणार अस वाटले आणि काही तरी गडबड होणार मग पुन्हा एकदा गाडी चालू केली आत्ता खिंड एकदम समोर दिसत होती. कधी नव्हे ते पहिल्यांदा माझ्या अचानक दोन्ही ढोपारामध्ये cramp आला. थोडा वेळ sack सोडून बसलो. तेव्हा ह्या मंडळीना आवाज दिला पण “हू नाही कि सु” मग मला वाटले कि खूप मागे पडलो आहे. खिंड आत्ता मी ओलांडली होती खाली २-३ वाडे आहेत त्यांना विचारल कोणी गेल का पढरवाडी कडे तर ते बोले कोणीच दिसले नाही. आत्ता टार्गेट पढरवाडी होते १५-२० मिनटात पोहोचणार हे माहित होते पण तरी ही मंडळी कुठे राहिली त्याची वाट बघावी का? पण हे काही रस्ता चुकणार नाही होते मग राहिले कुठे. पढरवाडीला मी पोचलो. तिथे विचारपूस केली कोणी मंडळी आली आहे का? तेव्हा ५ वाजले होते. मग मंदिरात sack ठेवून विहीर गाठली. आणि गावातला एक मुलगा मला बोलवायला आला तुमची लोक आलेत हा........जरा अजून बर वाटले. मग विचारपूस झाली का उशीर झाला तुम्हाला वगैरे. चहाची सोय पण झाली आता जेवायची तयारी करायची होती. घरी फोन करून आईला सागितलं मी एका गाव मध्ये आहे. गावामध्ये कोंबडा आहे का त्याची विचारपूस झाली आणि ४५० रुपयांना दोन कोंबडे आम्ही घेतले. रातीच जेवण ९ वाजता झाल आणि लवकर मस्त झोप लागली.......
सकाळी ७ वाजले होते तेव्हा जाग आली लवकर तयारी करून मला निघायचं होते. ही मंडळी त्या दिवशी पण भीमाशंकरच्या खाली जिथे गणेश घाट व शिडी घाट वेगळा होतो तिथे राहणार होते पण मला भीमाशंकर करून मुंबईला घरी जायचं होते गावातून २ लिटर दुध घेतलं होत. मग सकाळचा चहा नाश्ता झाला. दुध अजून बाकी होत, रात्रीच्या भात बाकी होता, रस्सा पण बाकी होता. मग सर्वानी पुन्हा ताव मारला मी तर दुध भाता खाल्ला. माझ्या आत्ता पर्यंतच्या ट्रेकिंग मधला सर्वात जास्त नाश्ता ह्या ट्रेकला केला. Sack भरायला चालू केली लवकरच बाहेर निघालो तेव्हा ८:१५ वाजले होते. अजून ४ ते ५ तास लागणार भीमाशंकरला जायला हे माहित होते. मग चालू झाला दुसरा दिवस आत्ता मी त्या मंडळी बरोबर चालत होतो पुढे एक मातीचा रस्ता लागला कि मी त्यांना सोडून जाणार होतो. पण तिथे गेलो तेव्हा मोबाईल चालू केला घरी आईला निरोप सागितला. आत्ता Sackमध्ये अज्जिबात पाणी नाही मग पाणी भरून घेतलं तोपर्यंत हे खूप पुढे निघून गेले होते. आत्ता पुन्हा त्यांना गाठून पुढे जायचं होते परंतु इथे काही मंडळी खूप पुढे निघाली होती आत्ता त्यांना सांगायला गेलो तर तिथून पेठच दर्शन झाल. अर्धी मंडळी पुढे जायचे कारण पण तसच विशेष होत थोडा रस्सा डब्यांमध्ये भरून घेतला होता भात पण बाकी होता. माझ्या Sack मध्ये ब्रेड होते मग काय पुन्हा चालू झालो. मला लवकर आवरून गाडी चालू करायाची होती. आता भेट थेट कमळजाईच्या मंदिर जवळ करायची इच्चा माझी होती मी पुढे गेलो. मला खेकड्यांचे भारी वेड आहे. कमळजाईच्या च्या पठारावर मी खूप वेळ खेकडे पकडून सोडत होतो पण त्यात जास्त काही मज्जा नाही आली मोठे खेकडेच दिसले नाहीत. शेवटी थेट निघालो भीमाशंकरला पोहोचायचे म्हणून १२ वाजले होते. तिथे मागची मंडळी पुन्हा एकदा जवळ आली शेवटी मी एकत्र चालत होतो भीमा नदी ओलाडेपर्यंत मग सर्वाची भेट घेवून मी १ वाजत पुन्हा एकदा एकटा निघालो भीमाशंकर मंदिर गाठायला. १:३० वाजला होता भीमाशंकरला लांबूनच नमस्कार करून घरच्यासाठी प्रसाद घेतला. शिडीघाटाने खाली जायचं ठरवले तेव्हा २ वाजले होते शिडीघाटाने खाली जाण्याची ही पहिली वेळ होती. गेल्या महिन्यामध्येच भीमाशंकरला शिडीघाटाने वरती गेलो होतो काही भाग शेवाळलेला असणार हे माहित होते पण गणेशघाटाने वेळ जास्त लागणार मग कश्याला पाहिजे गणेशघाट अस बोलत शिडीघाट चालू झाला पहिलाच धबधबा मग Sack बाजूला काढून थोडा भिजलो मग उतरायला चालू केल पण एका ठिकाणी जो काय पाय घसरला मग तेव्हा थोडी उदास झाली होती सर्व ट्रेक मध्ये सर्वात जास्त उदास शिडीघाटाने खाली उतरताना झाली होती. तरी हळू हळू उतरत होतो ४ वाजता बरोबर गणेशघाटाकडून येणारा रस्ता आणि शिडीघाटाकडून येणाऱ्या रस्त्यावरती आलो तेव्हा खूप आनंदी झालो. पहिले फोन करून घरी सागायचं होत आणि दुसरा फोन करायचं होता त्या जितेन पाटलाला......ज्यांनी ही कल्पना सुचवली त्याला ट्रेकला जाताना काही टिप्स व नकाशा घेवून गेलो होतो एक पेपर वरती प्रिंट काढून.
Arun Sir-9869474343
Vikram Singh TMI-9987761562, 8652028262
Jiten Patil-9987798479
My home 9967250989,9699673281,28209237.
Arun Sir-9869474343
Vikram Singh TMI-9987761562, 8652028262
Jiten Patil-9987798479
My home 9967250989,9699673281,28209237.
Self-9221831364,7276574971.
Tugarli To valvand. valvand to kusur 7 hrs by walking. Kusar to khandi 5 km .khandi to savle 7km. savle gaon to vandre khind 2:30 hrs. Take left side turn towards one vilaage (paderwadi). then kamalji temple 3 hrs. near bhima rever. need to cross river 2 time. after one ascending 45 min you will reach bhimashanakr
HDFC bank, Tugarli damp Right side la……ek gaon lagel .gavatun saral pude jayach ahe rajmachi cha path ahe. Tithun Right turn valavand gaon ahe…happy journey.....:)








वाह...!
ReplyDeleteवाह.....!!
वाहव्वा.....!!!
जबरदस्त एकला चलो ट्रेक��
लोणावळा ते भिमाशंकर हे
अंतर तसे जास्तीचेच आहे,पहिलाच सोलो ट्रेक, त्यात सप्टेंबर महिन्यात ट्रेक म्हणजे जमिन ओली घसरडी असतेच म्हणजे रिस्क आलीच,त्यात शिडीघाटमार्गे म्हणजे घसरण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यातून जास्तीचं भलं मोठ्ठं सामान, तरीही यशस्वीरित्या सोलो ट्रेक पूर्ण करणे.��% कौतुकास्पद आहे.
खूप इत्यंभूत माहिती मिळाली. फोटोग्राफी सुंदरच����निसर्ग देखणाच. कोणी चालेंज केल्यासारखा प्रश्न जरी विचारला तरी लगेच साहस,धाडस दाखवण्याचे सामर्थ्य,व ते पुर्ण करण्याची जिद्द आपण राखून आहात. गुरूंकडून खूप चांगल्या गोष्टी आत्मसात केल्यात आपण.आपल्या सानिध्यात रहाणारे सर्व धन्यच होणार.��✨
ट्रेकचे वर्णन खूपच छान केले आहे. माहितीपूर्ण लेख.����
अभिनंदन.✨����☘️��
Khup chan...yatala Lonavala to Kusur Gav asa ardha trek mi kela ahe...tasech 3-:4 mahinyapurvi shidichya vatene var yeun ambenali ne Khali gelo hoto
ReplyDeleteThanks
Deleteखूप मस्त.
ReplyDeleteइच्छा खूप आहे लोभी ट्रेक चि. बघुया कधी योग येतोय.
अरुण सरांनी मागच्या वर्षी विचारले होते. परंतु कामामुळे येण नाही झाले. परंतु आता कधी ट्रेक लावलात तर नक्की कळवा.
Thanks
Delete